राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोना ची लाट (COVID-19) ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. डेल्टा प्लसच्या 66 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता डेल्टा प्लसची रुग्णसंख्या राज्यात 66 वर पोहोचली असून जळगावात सर्वाधिक 13 रुग्ण आहे. तर 19 ते 45 वयोगटात सर्वाधिक लागण झाली आहे.
महिला आणि पुरुष रुग्णाची संख्या जवळपास सारखी आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यांनी दोन्ही डोस घेतले असे 10 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर उर्वरीत 31 जणांना कुठलेही लक्षण नाही.
कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेले 10 जण आढळले आहे. लस घेतलेल्या 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.
तर दुसरीकडे, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आहे. आज राज्यात 5,861 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज राज्यात 6,686 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 158 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 % एवढा आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६३,००४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


