प्रतिनिधी पांडुशेठ साठम
कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.त्यांच्या मागणीनुसार दुसऱ्या डोससाठी आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ हजार कोविड लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये कोविशिल्ड च्या १५ हजार व कोवॅक्सीन च्या ६ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत.
गणेशचतुर्थी हा सण काही दिवसांवर असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्येने चाकरमानी दाखल होतात. परंतु कोरोनाचे संकट कायम असल्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरणाच्या दुसऱ्या डोस ची जिल्ह्यात कमतरता भासत असल्याने आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ज्यादा लसींची मागणी केली होती. त्यानुसार मागील आठवड्यात सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला होता. तसेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २१ हजार कोविड लसी पुरविण्यात आल्या आहेत. गणेश चतूर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्यावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा भर असून पुढील टप्प्यात जिल्ह्यासाठी ५० हजार कोविड लस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.