राज्यात आजपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल

0
120

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्र अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपासून राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध (Lockdown Restrictions) आणखी काही प्रमाणात शिथिल होणार आहे. राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकानं आजपासून रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, मॉल्स आणि शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहक, दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे खासगी कार्यालये, लोकल ट्रेनलाही (Mumbai Local Train) सूट देण्यात आली आहे.

काय सुरु? काय बंद? (Maharashtra Unlock Update)

  • शॉपिंग मॉल आणि दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र त्या ठिकाणी आलेले ग्राहक, मालक आणि कर्मचाऱ्याचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत.
  • खुल्या जागेत विवाह सोहळ्यात 200 लोकांची मर्यादा तर हॉलमध्ये एकूण जागेच्या 50 टक्के लोकांना मुभा.
  • नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार.
  • खाजगी कार्यालये गर्दी टाळण्यासाठी 24 तास सुरू ठेवण्याची मुभा. मात्र शिफ्टमध्ये काम करण्याचे आवाहन
  • कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झालेल्या खाजगी कार्यालयांना शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा.
  • कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू
  • सिनेमागृह, नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार.

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले (Maharashtra Unlock Update) असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वाजारोहणानंतर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागू शकतो असा इशारा दिला आहे. “कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. मात्र, ऑक्सिजनची कमतरता हा चिंतेचा विषय आहे. ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवूनच आपण ही शिथिलता दिली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here