तालिबानने रविवारी सायंकाळी देशाची राजधानी काबूलमध्ये कब्जा मिळवला.तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे.तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे.
अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो.हिंग तयार करण्यासाठीचे मूळ साहित्य आणि शहाजिरे याचाही पुरवठा अफगाणिस्तानातून होतो.अफगाणिस्तानमधून सुमारे ३८ हजार टन सुकामेव्याची भारतात आयात होते. अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या कालावधीत किमती वाढण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडली असतानाही व्यावसायिक नातं पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होईल अशी अधिकाऱ्यांना आशा आहे.


