राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज

0
111

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज (Havey Rains Forecast) व्यक्त करण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने येत्या 24 तासांमध्ये राज्यात मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला (Maharashtra Rain Update) आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता (Weather forecast) आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट (Red alert in Yavatmal district) देण्यात आला आहे

राज्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता पुढीन 24 तासात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कुलबा शाळेने हवामान खात्याने आज नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांना अलर्ट ( Alert) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला होता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी जवळच्या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला. Red alert in Yavatmal district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here