सिंधुदुर्ग – शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये माजी सैनिक, विधवा यांचे पाल्य इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत, अशा माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पात्र माजी सैनिक, विधवा यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडे सादर करावेत. या तारखेनंतर प्राप्त प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात


