नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी चेक पोस्ट पोलीस अधिकाऱ्यांना बांधले रक्षाबंधन

0
136

प्रतिनिधी पांडुशेठ साठम


नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य , यांच्या, वतीने आज दी 22आँगस्ट2021रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी व अवैध धंद्याच्या वाहतुकीमुळे वाढणारी व्यसनाधीनता वाढीस लागते त्यावर नियंत्रण करावे म्हणून सर्व वाहतूक व्यवस्था अधिकारी व पोलिस अधिकारी यांना राक्षाबंधन करण्यात येते आहे.

याच उद्देशाने चेक पोस्ट येथे शिरगाव ता. देवगड,मा. श्री.निलेश पाटील, पोलिस अंमलदार यांना राखी बांधुन अवैध धंद्याच्या वाहतुकीवर काटेकोरपणे नियंत्रण करावे आणि विविध अंमली पदार्थ वाहतुक बंदीच्या कायद्याचे पालन करावे तसेच कटाक्षाने मेहनत घेऊन व्यसन मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कार्यक्रमात पोलिस अधिकारी म्हणून आपला सहभाग मोलाचा असतो. शिवाय आपल्या प्रयत्नांमुळे समाजात व्यसनांच्या प्रसाराला प्रतिबंध करता येतो . आजच्या दिवशी व्यसनमुक्तीच बंधन, व्यसनांपासून रक्षण”या कार्यक्रमांतर्गत व्यसनमुक्तीची राखी बांधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here