कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा-कॉलेज बंद आहेत.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात घेता बऱ्याच परीक्षाचे वेळापत्रक जाहीर होत आहेत. अशामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परिक्षा या दोन्ही परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या परिक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत म्हणजे 25 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवार https://mahatet.in/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करु शकतात. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र कोरोनामुळे या तारखेत बदल होण्याची शक्यता परिक्षा परिषदेने वर्तवली आहे.
https://setexam.unipune.ac.in/Home.aspx या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे. परिक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी विद्यार्थी आपले प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डायरेक्ट डाउनलोड करु शकतात.
परिक्षा पेपर 1 – 10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजता)
परिक्षा पेपर 2 – 10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 2 ते संध्याकाळी 4.30 वाजता)