टोक्यो पैरालिंपिकमध्ये भारताला श्रावणातला सोमवारचा दिवस लाभदायक ठरला आहे.भारताला आज नेमबाजीत अवनी लखेडाने 10 मीटर एअर रायफल एसएच-1 मध्ये पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले.तसेच भालाफेकपटू सुमित अंतिलने F64 भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
हे सुवर्ण पदक जिंकताना सुमितने एफ-64 प्रकारात 68.55 मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे. सुमितने तीन वेळा विश्वविक्रम केला आहे. त्याने पहिल्यांदा 66.95 मीटर, दुसऱ्यांदा 68.08 मीटर आणि नंतर 5 व्या आणि शेवटच्या वेळी 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला आहे.भालाफेक AF 46 मध्ये याआधी देवेंद्र झझारिया आणि सुंदर सिंह गुर्जर यांनी अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक मिळवले होते.


