कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला तर जिल्ह्यातील सकल भागात पाणी साचलं आहे.
निर्मला नदीला पुर आल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांचा गेल्या दोन तासापासून संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे


