गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी 39 हजार 522 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 43 हजार 906 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 218 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सलग 5 दिवसांनंतर सक्रिय रुग्णांत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रविवारी देशात सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 4 हजार 611 ने घट झाली आहे.
कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे.
कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.


