सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 13 मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि फराह खान या शुक्रवारी ‘शानदार शुक्रवार’च्या भागात हॉट सीटवर दिसणार आहेत.हा खास भाग येत्या शुक्रवारी रात्री 9:00 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.या दोघींच्या सोबतीला इंडियन आयडॉल 12 चे सहा स्पर्धक असणार आहेत.
या भागात त्यांनी जिंकेलली रक्कम दीपिकाच्या ‘द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ला दान करण्यात येईल तसेच फराहकडून अयांश मदनच्या उपचारांसाठी रक्कम देण्यात येईल.


