सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 3 लाख 81 हजार 516 नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण

0
137

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 81 हजार 516 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 809 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 912 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 992 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

तसेच 60 वर्षावरील 1 लाख 6 हजार 117 व्यक्तींनी पहिला डोस तर 68 हजार 788 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 18 हजार 322 नागरिकांनी पहिला डोस तर 70 हजार 860 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 37 हजार 331 जणांनी पहिला डोस तर 18 हजार 981 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 5 लाख 55 हजार 946 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 640 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 3 लाख 88 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 36 हजार 160 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 4 लाख 19 हजार 374 कोविशिल्ड आणि 1 लाख 36 हजार 572 कोवॅक्सिन असे मिळून 5 लाख 55 हजार 946 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 6 हजार 670 लसी उपलब्ध असून त्यापैकी 3 हजार 230 कोविशिल्डच्या आणि 3 हजार 440 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 330 लसी शिल्लक असून त्यापैकी 2 हजार 240 कोविशिल्ड आणि 90 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here