अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचे मोठे बंधू रोहल्लाह सालेह पंजशीरहून काबुलला जात होते. तालिबान्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी सालेह यांना घेरले, कैद केले आणि नंतर निर्घृणपणे हत्या केली.तालिबान्यांनी प्रथम सालेहला चाबकाने आणि विजेच्या तारांनी मारले, नंतर त्याचा गळा कापला. नंतर तडफडत असलेल्या साहेल यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्या.
तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले. यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. त्याच वेळी, त्यांनी, पंजशीरच्या लढवय्यांसह, राष्ट्रीय प्रतिरोध दलाच्या बॅनरखाली तालिबानविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले.