केंद्र सरकारची युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवण्याची तयारी पूर्ण

0
90

केंद्र सरकार युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवत आहे. या कार्डमध्ये आरोग्याशी संंबंधित सर्व माहितीची नोंद असणार आहे. या कार्डमुळे देशभरात कुठेही कोणत्याही दवाखान्यात आपले मेडिकल रिपोर्ट््स सोबत नेण्याची गरज राहणार नाही. कारण तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री हेल्थ कार्डमध्ये नोंदलेली असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) कार्ड याच महिन्यात सुरु करणार आहेत. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये डॉक्टर, रुग्णालये, लॅब आणि केमिस्टचीही माहिती नोंदलेली असेल. या राज्यांत युनिक कार्ड बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता ही योजना देशभरात सुरू केली जाईल.हेल्थ कार्डची घोषणा होताच गुगल प्ले स्टोअरवर एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड (पीएचआर अॅप्लिकेशन) उपलब्ध होईल. त्याद्वारे नोंदणी होईल. या युनिक आयडी १४ डिजिटचा असेल. नोंदणीकृत सरकारी-खासगी रुग्णालये, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर येथे कार्ड तयार होईल.

हेल्थ कार्डचा १४ डिजिटचा नंबर नोंदणीकृत रुग्णालयाच्या संगणकात नोंदला गेल्यानंतरच ओटीपी नंबर जनरेट होईल. त्यानंतर जेव्हा ओटीपी नंबर भरला जाईल तेव्हा डेटा स्क्रीनवर दिसेल. पण तो कॉपी करता येणार नाही तसेच ट्रान्सफरही करता येणार नाही. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या रुग्णाचा डेटा शोधला जाईल तेव्हा पहिल्या रुग्णाचा डेटा लॉक होईल. तो पुन्हा पाहण्यासाठी पुन्हा ओटीपी लागेल. हेल्थ कार्ड तयार करायचे आहे की नाही हे आपल्या इच्छेवर अवलंबून असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here