उत्तर गोव्याच्या किनाऱ्यावर टारचे (तेलाचे) गोळे आढळून आल्यानंतर आता सालसेट किनाऱ्यावरही असे तेलाचे गोळे आढळून आले आहेत.बेनालिम किनाऱ्यावर असे छोटे गोळे जून महिन्यात आढळून आले होते आणि त्यांचा आकारही मोठा होता. कधीकधी वर्षभर छोटे तेलाचे गोळे किनारपट्टीवर आढळून येतात पण यावेळी हे गोळे मोठ्या आकाराचे आहेत
पर्यावरण वादी संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही तेल कंपनीच्या निघालेल्या उत्सर्जित केलेल्या तेलाच्या मळीमुळे असे गोळे समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर येत असावेत.पण यामुळे समुद्रकिनारा खराब होत आहेच पण त्यामुळे सागरी जीवांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
हे असे टारचे गोळे पावसाळ्याच्या सुरवातीला तसेच पावसाळ्याच्या शेवटी गेल्या दोन वर्षांपासून आढळून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.त्याशिवाय समुद्रकिनार्याची देखभाल करणारी लोक हे टारचे गोळे जमिनीत खड्डा करून अथवा वाळूत बुजवतात.पण अशामुळेही जमिनीची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी होते.आणि जमिनीचा पॉट खराब होतो.त्यापेक्षा रस्ते तयार करण्यासाठी याचा waper करावा असेही त्यांनी सुचविले.शासनाने याची दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले.