‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेली गायिका आर्या आंबेकर एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. आर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउन्टवर मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या अफवा आहेत. ते माझे मार्गदर्शक आहेत. मी त्यांचा कायम आदर करते आणि करत राहीन . मला त्याचं कौतुक वाटतं”, असे म्हटले आहे.“मी आधी चर्चांकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते. मात्र काही ओळखीच्या व्यक्तींबद्दल काही गोष्टी बोलल्या जात असल्याचे समजले. त्यामुळे मी ते स्पष्ट करण्याचे ठरवले. गेल्या 12 वर्षांपासून इंन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही. तसेच, यूट्यूबवरील सबस्क्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्हूवज् विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही, ते माझ्या नैतिकते बसत नाही.” असं आर्याने लिहिले आहे.
आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्स केले आहेत. त्याचप्रमाणे तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी देखील गाणी गायली आहेत.‘ती सध्या काय करते’ चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीलाही सुरुवात केली आहे .


