कोविड-१९ च्या काळात मे-२०१९ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक,वाहनमालक यांच्यावर ६३ हजार ८९७ अनपेड ई चलान केसेस केल्या आहेत.आजपर्यंत १ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड भरलेला नाही. या दंड वसुलीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार विधी व सेवा प्राधिकरणामार्फत २५ सप्टेंबर रोजी लोक अदालत भरविण्यात येणार आहे.जे वाहनधारक दंड भरणार नाहीत,त्यांना विधी व सेवा प्राधिकरणामार्फत २५ सप्टेंबर रोजीच्या लोक अदालतीत दंड भरण्याकरिता नोटीस पाठविण्यात येणार आहे.
ज्या वाहनावर ई चलान अनपेड केसेस आहेत, त्यांनी थकित दंडाची रक्कम १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत भरणा करावी. भरणा सर्व पोलीस ठाणे,जिल्हा वाहतूक शाखा,खारेपाटण व पत्रादेवी तपासणी नाका येथे रक्कम स्वीकारली जाईल,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.
अनपेड चलान दंड वसुलीसाठी ९३०७६८०६०१ आणि ९६७३९०७४९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.


