देशातील अनेक राज्यात मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या 6 संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली आणि मुंबईसह काही भागांमध्ये स्फोट आणि दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा कट होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांमधील एक जण मुंबईंच्या सायनमधील धारावीमध्ये राहाणारा आहे. जान मोहम्मद अली शेख असे या दहशतवाद्यांचे नाव आहे. जानच्या चौकशीमध्ये जोगेश्वरीत राहणाऱ्या आणखी एकाचे नाव समोर आले आहे. या संशयित दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र एटीएसने मुंबईच्या जोगेश्वरीमधून झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने मुंबई क्राईम ब्रँचच्या मदतीने झाकीरला जोगेश्वरीमधून ताब्यात घेतले. झाकीरला त्याच्या घरातून उचलण्यात आले आहे. धारावीमध्ये राहणारा संशयित दहशतवादी जानने चौकशी दरम्यान झाकीरचे नाव घेतले होते.


