कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत उत्सुकता होती.अंबिका सोनी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून समोर आले होते.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याच्या 24 तासांनंतर अखेर पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले. काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाब राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून बिनविरोध निवड झाल्याची माहिती पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून दिली.
सुखजिंदर सिंह रंधावा माढा क्षेत्राचे मोठे नेते आहेत. रंधावा हे डेरा बाबा नानक मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि कॅप्टनच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. रंधावा यांनी 2002, 2007 आणि 2017 मध्ये निवडणुका जिंकल्या आहेत.


