पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रावर शर्लिन चोप्रापासून पूनम पांडेपर्यंत अनेकांनी गंभीर आरोप लावले होते. हे प्रकरण मुंबई सायबर पोलिसांकडे 2020 मध्ये नोंदवण्यात आले होते.राज कुंद्राला अटक आणि नंतर प्रथम 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्राला सोमवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला आहे. राज कुंद्रासह त्याचा आयटी प्रमुख रायन थार्प याचीदेखील जामिन याचिका मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकरणात कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले की, राज कुंद्रावरील सर्व आरोप निराधार आहेत. राज कुंद्राने तयार केलेला कंटेंट पोर्नोग्राफीच्या कक्षेत येत नाही तर हा एक इरॉटिक कंटेंट आहे.