गोवा राज्याचा कोरोनाचा रेट २% आला असून रविवारी राज्यात ८४ रुग्ण सापडले, तर २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाच्या ४१७८ चाचण्या करण्यात आल्या होत्या.गुरुवारपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी सलग नऊ दिवसात ८०० च्या खालीच रुग्णसंख्या आहे.दरम्यान दोन ८० वर्षांच्या वृद्धांचा मृत्यू GMC मध्ये आणि उत्तर गोव्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
यातील एक महिला असून त्यांना मधुमेहाचा आजार होता आणि त्या ४ दिवस रुग्णालयात होत्या.दाखल होण्याच्या २ दिवस आधी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.तर दुसरे रुग्ण किडनीच्या आजाराने दाखल झाले होते त्यांना दखल होताना कोरोनाची चाचणी करण्यात आली होती.
रविवारी १६ नवीन कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून ६८ कोविड पॉझिटिव्ह लोकांना घरीच विलगीकरणात राहण्याचे निर्बंध घातले आहेत.गेल्या चोवीस तासात ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७९ रुग्ण सुधारत आहेत.त्यामुळे हा रेट ९७.७% झाला आहे.


