मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने यास १७ तारखेला मान्यता दिली असून यावर्षी एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे महाविद्यालय सुरू होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, श्री.अरूण दुधवडकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.