मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे.‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ या जाहिरातीमधील ‘अलार्म काका’ म्हणून ते लोकप्रिय होते.
‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटांत ते झळकले होते.मोती साबणाच्या जाहिरातीतील त्यांनी साकारलेली ‘अलार्म काकां’ची भूमिका बरीच गाजली होती.चित्रपटच नव्हे तर करमरकर यांनी अनेक जाहिरातींमध्येही काम केले. इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीत त्यांनी काम केले आहे.मराठी मनोरंजन विश्वामध्ये करमरकर आबा म्हणून ते ओळखले जायचे.


