स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एण्ट्री होणार आहे. शर्मिष्ठा राऊत या मालिकेत नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. नीलिमा च्या येण्याने मालिकेला नवं वळण येणार आहे.
नीलिमाचा वापर सिद्धांत माऊचे वडिल म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्यासाठी करणार आहे. त्यांचा हा डाव यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. पण नीलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.