देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत आहे. भारताची एकूण लसीकरण संख्या 83 कोटीच्या पुढे गेली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी गुरुवारी सरकारने घरोघरी लसीकरणाला परवानगी दिली आहे अशी माहिती दिली आहे .
जे लोक लसीकरण केंद्रात जाण्यास असमर्थ आहेत त्यांना लसीकरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे. दिव्यांग किंवा जे लोक लसीकरण केंद्रात जाऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी घरोघरी लसीकण करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे.सक्रिय प्रकरणांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या देशात तीन लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत. यापैकी 1 लाखांहून अधिक केरळमध्ये आणि 40 हजारांहून अधिक महाराष्ट्रात आहेत. 6 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या 100% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.