स्नेहा दुबे या संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या प्रथम सरचिटणीस असून त्या 2012 च्या बॅचची IFS अधिकारी आहेत. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फटकारल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
स्नेहा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश मिळाले. IFS झाल्यावर त्यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली. 2014 मध्ये त्यांना भारतीय दूतावास माद्रिद येथे पाठवण्यात आले. सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी या विद्यापिठातून एमए आणि एफफिल केले आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गोव्यातून पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या नागरी सेवा अधिकारी आहेत.


