सिंधुदुर्ग: केंद्र सरकारमार्फत असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी देण्यात येणाऱ्या ई श्रम कार्डचे आज जिल्ह्यातील 4 लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सरकारी कामगार अधिकारी सचिन कोल्हाळ, सीएससीचे विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित, दुकाने निरीक्षक रवीराज हुबे, सीएसीचे जिल्हा व्यवस्थापक तोरणकुमार इनामदार आदी उपस्थित होते.
यावेळी पोईप येथील समीर परब, मारुती वडर, शंकर वडर आणि मयुरी सरमळकर या लाभार्थ्यांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. केंद्र शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवरील माहितीच्या अधारे असंघटित क्षेत्रातील कामकागारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातात. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे.