2 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबरला पावसाची शक्यता

0
105

‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक निघून गेल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे.पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर कमी राहणार आहे. पण मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुलाब चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात आणखी एक नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.गुलाब चक्रीवादळातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव सध्या गुजरात आणि खंबातच्या आखातावर आहे. 30 सप्टेंबरला सकाळपर्यंत उत्तर-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर नव्या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहेत. नंतर हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाऊन पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here