गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे. सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोमवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 45,500 रुपये झाले आहे. मागच्या ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 45,480 रुपये प्रती 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तर चांदीचा दर हा 60,500 रुपये प्रति किलो झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला सोने-चांदीचे दर स्थिर होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.देशात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपये झाला आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये झाला आहे.पुण्यामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,790 रुपये झाला आहे. तर पुण्यात कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,950 रुपये झाला आहे. नागपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,500 रुपये झाला आहे. तर नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,500 रुपये झाला आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर 605 रुपये आहे. चांदीच्या कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर सतत बदलत असल्याचे दिसत आहे.