राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पुर आला.शेतकऱ्यांचे नुकसान तर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. यामुळे राज्य सरकारकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली होती तर आता राज्य मंत्रिमंडळाने 365 कोटी 67 लाख रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.


