मुंबई: नवी मुंबईतील न्हावा शेवा येथे इराणमधून आणलेला एक कंटेनर जप्त करण्यात आला. या कंटेनरमधून आलेले 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत सुमारे 125 कोटी असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणात नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यापारी जयेश सांघवी या एका व्यक्तीला डीआरआयने अटक केली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेत हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. हे कंटेनर वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी आयात केले होते, त्यांचे कार्यालय मस्जिद बंदरमध्ये आहे. त्याच्याविरुद्ध नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात DRI ने मुंबई बंदरातून 293 किलो हेरॉईन जप्त केले होते आणि संधू एक्सपोर्ट्स पंजाबचे मालक प्रभाजित सिंह यांना अटक केली होती. सांघवीने त्याला त्याच्या फर्मच्या IEC वर इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी 10 हजार रुपये प्रति खेप अशी ऑफर दिली असल्याचे ठक्करने DRI ला सांगितले. तो 15 वर्षांपासून सांघवीसोबत व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला.


