ड्रग्स प्रकरण: शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU’S ने थांबवल्या

0
114

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर मोठा फटका बसला आहे. शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU’S ने थांबवल्या आहेत. शाहरुख बायजूसच्या सर्वात मोठ्या स्पॉन्सर्ड डील्सपैकी एक आहे. लहान मुलांच्या अभ्यासासाठी असलेले बायजूस शाहरुखचा चेहरा वापरून काय संदेश देत आहे? असा सवाल केला जात आहे.शाहरुखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे.

बायजूस ॲपमध्ये शाहरुख खान लोकांना आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी आणि ट्युशनसाठी बायजूस किती महत्वाचे आहे हे सांगत होता.या ब्रँडिंगच्या माध्यमातून शाहरुखला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये मिळत होते. सिलिकॉन व्हॅलीच्या गुंतवणूकदार एनालिस्ट मेरी मीकर्स यांच्या कंपनीने बायजूसध्ये गुंतवणूक केली आहे.या व्यतिरिक्त शाहरुख खानकडे ICICI बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टूरिज्म, ह्युंदे यासारखे इतर 40 मोठे ब्रँड आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here