पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अणुशास्त्रज्ञ वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांचे अल्पश: आजाराने रविवारी निधन झाले.१९३६मध्ये भोपाळमध्ये जन्मलेले आणि १९४७ साली विभाजन झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पाकिस्तानमध्ये गेलेल्या अब्दुल खान यांनी इस्लामाबादच्या खान रिसर्च लॅबोरेटरीज रुग्णालयात आज शेवटचा श्वास घेतला.
अब्दुल खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर २६ ऑगस्टला केआरएल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रावलपिंडीमधील एका लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.