बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा 79 वा वाढदिवस!अमिताभ बच्चन यांनी वाढदिवस साजरा करताना एक मोठा निर्णय घेतला आहे.नी ‘कमला पसंद’सोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.
‘कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे आणि प्रमोशन फी देखील परत केली आहे असे त्यांच्या ऑफिसच्या वतीने सांगण्यात आले असून अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.


