पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे.चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा ४० हजार चौरस फुट जागेत पसरलेला बंगला आहे. चोरीचा प्रकार हा 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला असावा आसा अंदाज आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून तुरुंगात आहेत.डीएसके यांच्या अटकेनंतर ED ने हा बांगला जप्त केला होता.
बंगल्यातून 18 एलईडी टी.व्ही, लॅपटॉप, कंप्युटर, कॅमेरा, गिझर, इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेल्या आहेत.तसेच पिठाच्या गिरणीसह देवघरातील चांदीच्या वस्तूही चोरट्यांनी केल्या लंपास केल्या असल्याचे भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी सांगितले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.