कोळशाचे संकट असलं तरी वीज कपात होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात राज्यात कोळशाच्या संकटानंतरही 27 पैकी फक्त 4 पॉवर प्लांट बंद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मंत्री नितीन राऊत म्हणाले, “मंत्री नितीन राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात विजेची मागणी 17500 मेगावॅट ते 18000 मेगावॅट आहे. ही मागणी शिखर काळात 22000 मेगावॅट पर्यंत जाते. राज्यात 3500 ते 4000 मेगावॅट विजेची कमतरता आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अखेरीस शिखर कालावधीत वीज 20 रुपये प्रति युनिट दराने खरेदी करावी लागली होती. आता 16 ते 17 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केली जात आहे. काही कंपन्या करार होऊनही आम्हाला वीज न देता बाहेर वीज विकत आहेत. अशा कंपन्यांना नोटीस पाठवली जाईल”, अशी माहितीही यावेळी राऊत यांनी दिली.आम्ही कोळसा आयात करणार नाही आणि केंद्र सरकार आयातीला परवानगीही देऊ शकत नाही. कोळशाचे संकट नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले