क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावणीनंतरआर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये आहे.
शाहरुखने आर्यनसाठी सतीश मानशिंदे यांच्यासह अमित देसाई या मुंबईतील मनामांकित वकीलांचीही नियुक्ती केली आहे. वकील अमित देसाई यांनी सलमान खानची केस लढली आहे.आर्यनच्या जामिनावर सुनावणी दुपारच्या जेवणानंतर म्हणजेच दुपारी 2.45 च्या सुमारास होऊ शकते.एनसीबीने आर्यनसह 20 लोकांना अटक केली आहे, ज्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
एनसीबीने या प्रकरणी न्यायालयाकडे एक आठवड्याचा वेळ मागितला होता. न्यायालयाने बुधवारपर्यंत म्हणजेच आजपर्यंत एनसीबीला वेळ दिला होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणतात की आम्ही आणि फिर्यादी प्रयत्न करू की केस निष्कर्षापर्यंत पोहोचेल, आमची केस मजबूत आहे आणि आम्ही ते कोर्टात सादर करू.


