मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास रुग्णांना रुग्णालयात जावे लागत आहे. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहे याची माहिती रुग्णांना मिळत नाही. पण अशा रुग्णांना तातडीनं उपचाराची गरज लागते. अशा गरजू रुग्णांना वेळेत बेड्स उपलब्ध व्हावेत याकरता मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
हे नोडल अधिकारी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे.