गेल्या वर्षी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी (G-23) सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज असल्याची भावना व्यक्त केली होती.त्यावरून जे काही बोलायचे असेल तर स्पष्ट माझ्याशी बोला मीडियाच्या माध्यमातून नको असेही सोनिया गांधींनी ठणकावले आहे आणि मीच काँग्रेसची फुल टाइम अध्यक्ष असल्याचा स्पष्ट संदेश सोनिया गांधींनी शनिवारी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.
काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत मतभेदांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच, राहुल गांधी यांचे सर्वात जवळचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या भविष्याची चिंता आहे.


