कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीकरता सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नवीन स्कीम जाहीर

0
100

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातच या लसीकरणाबाबत लोकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होत आहे. हे सर्व बघितल्यानंतर लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरन करावे यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक नवीन एक स्कीम जाहीर केली आहे .

या स्कीमचे नाव ‘इम्यून इंडिया डिपॉझिट’ स्कीम असे आहे. या स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट (FD) केल्यावर चालू व्याज दरावर 0.25% जास्त लाभ मिळेल.या स्कीमचा मॅच्योरिटी पीरियड 1,111 दिवसांचा आहे. फक्त ठराविक काळासाठीच ही स्कीम सेंट्रल बँक ऑफ इंडियाने लॉन्च केली आहे.

या स्कीममध्ये कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीलाच फक्त भाग घेता येणार आहे त्यांना चालू व्याज दरापेक्षा 0.25% ज्यास्त व्याज मिळेल. तसेच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिले जाईल. बँकेने सांगितले की, जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here