अभिनेत्री पूजा बेदीला कोरोनाची लागण झाल्याचे तिने सोशल मीडियावर लिहिले आहे.तिच्यासह तिचा भावी पती आणि मोलकरीण यांचीही कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पूजा बेदीने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही.मी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतीही लस घेणार नाही, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे असेही तिने सांगितले आहे
रविवारी ऑनलाईन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा म्हणाली, “सगळ्यांना नमस्कार, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यासोबतच माझा बॉयफ्रेंड आणि काम करणारी मोलकरीण यांनाही कोरोना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मला काही अॅलर्जी झाली होती. यानंतर मला अचानक खोकला सुरु झाला. त्यासोबतच तापही येत होतो. मी काही दिवसांपासून माझे कपाट स्वच्छ केले होते. मला वाटलं धुळीमुळे अॅलर्जी झाली असावी. मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.’


