शिल्‍पा शेट्टीचा शर्लिन चोप्राविरुद्ध 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

0
93

बॉलिवूड अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी एक्‍ट्रेस-मॉडल शर्लिन चोप्राविरुद्ध सुमारे 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणात  शर्लिन चोप्राने लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकावण्याचा आरोप केला होता. शर्लिननं जुहू पोलिस स्टेशनमध्ये त्याबद्दल तक्रारही दाखल केली होती. तसेच तिला अंडरवर्ल्‍डकडून धमकी दिल्याचा देखील आरोप शर्लिननं केला आहे.

शर्लिननं राज आणि शिल्पावर सार्वजनिकरित्या आरोप केले आहेत. शर्लिनच्या प्रत्येक आरोपाला कोर्टात उत्तर दिलं जाईल, असा इशारा राज आणि शिल्पाच्या वकिलांनी दिला होता. त्यानंतर आता राज आणि शिल्पानं शर्लिनविरुद्ध 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here