रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे जोडी या चित्रपटात आहे. येत्या 5 नोव्हेंबर 2021 रोजीहा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाचा एक वेगळाच प्रभाव निर्माण केला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.
‘शेमारू मराठीबाणा’ नेहमीच वेगळ्या संकल्पना आणते.मराठीचा सार्थ अभिमान आहे हे ते नेहमीच दाखवतात.यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.
डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.


