सायनमधून तब्बल 21 कोटींचे हेरॉईन जप्त!

0
137

गेल्या काही दिवसांपासून देशभर अनेक ठिकाणी पडलेल्या छाप्यांमध्ये कित्येक कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले आहे. त्यातील महत्वाचे दोन छापे सगळ्यांच्याच चर्चेत आहेत .गुजरातमधील अडाणी पोर्टवरील करोडोंच्या किमतीचे अमली पदार्थ तर दुसरा आर्यन खानच्या क्रूझ ड्रग प्रकरणातील अटक.

त्यातच आज मुंबईतून तब्बल 21 कोटींचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. अमली पदार्थविरोधी पोलिसांनी सध्या धडक मोहीम हाती घेतली आहे. घाटकोपर युनिट- 7 ने सायन येथे ही कारवाई केली आहे. एका महिलेकडून ७ किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल 21 कोटी रुपये आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई यांनी अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. कोळीवाडा, म्हाडा चाळीमध्ये राहणारी एक महिला मोठ्या प्रमाणात हेरॉईची तस्करी करत असल्याची माहिती घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे घाटकोपर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. ड्रग्ज पुरवठादारांचे रॅकेट उद्धवस्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिल्यानंतर मंगळवारी छापा टाकण्यात आला.या महिलेच्या रेकॉर्डवर अनेक गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे.राजस्थान मधील एका व्यापाऱ्याकडून तिने हे हेरॉईन घेतले असल्याचे सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here