पंजाबमध्ये संध्याकाळी 5 नंतर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

0
94

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे.पेट्रोल पंप रात्रं-दिवस सुरु ठेवल्याने खर्च वाढतो. इंधनाचे दर वाढल्यामुळे आमचा इनपुट टॅक्स अधिकचा द्यावा लागत आहे.आमच्या कमिशनमध्ये वाढ होत नसून, तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे असोसिएशनच्या वतीने सध्या तरी 15 दिवस पेट्रोल पंप रात्री दरम्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज झालेल्या पंजाब पेट्रोलियम डिलर असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारसोबत आम्ही अनेकदा बैठका देखील घेतल्या मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.

येत्या 7 नोव्हेंबरपासून ते 21 नोव्हेंबरपर्यंत रात्रीचे पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 नोव्हेंबरला संपुर्ण दिवसभर पंप बंद करण्यात येतील. त्यात पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

पंजाब पेट्रोल असोसिएशनची बैठक लुधियाना येथे पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, या बैठकीत जालंधर, पटियाला, फतेहगढ साहिब, रोपड, मोहाली, होशियारपुर, मोगासह सुमारे 50 पेट्रोल पंप संचालक उपस्थित होते.रात्रीचे पंप बंद केल्याने काही प्रमाणात खर्च थांबेल. कारण रात्री माणसे ठेवणे आणि इतर खर्च हे आता न परवडणारे आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here