भिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ब्लॅडर कॅन्सरने त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.’अंतिम’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज दरम्यान त्यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांनी ते आता कर्करोगमुक्त झाले आहेत. ही शस्त्रक्रिया मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली होती.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले- “जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले, तेव्हा मला धक्का बसला नाही. मी ते स्वीकारले. असे अनेक लोक आहेत ज्यांना कॅन्सर होतो, पण ते लढतात आणि आयुष्य जगतात. मला फारसा त्रास झाला नाही. माझी टीम काळजी घेत होती आणि मदत करत होती. मला कोणतीही अडचण आली नाही. मी खूप आरामात होतो. सलमान आणि आयुष दोघेही खूप मदत करणारे होते.या चित्रपटात एक सुंदर कॅमिओ होता, म्हणून मी अभिनय केला. मी सलमानला इतक्या वर्षांपासून ओळखतो. तो माझ्यासाठी भावासारखा आहे, आम्ही एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. त्याला डायरेक्ट करणे अवघड नव्हते. कारण मला त्याच्याकडून नेमके काय हवे आहे हे मला माहीत होते. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबद्दल भारावून गेलो आहे किंवा घाबरलो आहे.”


