आर्यनच्या बेलची कागदपत्रे वेळेत तुरुंगाधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे आजची रात्रही आर्यनला तुरुंगातच राहावे लागणार आहे. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे स्वतः सेशन कोर्टातून बेल ऑर्डर घेऊन आर्थर रोज तुरुंगाकडे रवाना झाले होते, पण त्यांना तिथे पोहोचायला उशीर झाला.आर्यन खानला आजची रात्रदेखील तुरुंगातच काढावी लागणार आहे.तुरुंग प्रशासनानेही आर्यनच्या सुटकेच्या आदेशासाठी थोडा वेळ वाट पाहिली, पण तरीही आर्यनच्या जामिनाची कागदपत्रे पोहोचू शकली नाहीत.
तुरुंगाच्या नियमानुसार बेलची रिलीज ऑर्डर तुरुंगातील जामीन बॉक्समध्ये ठेवावी लागते. रिलीज ऑर्डर मेल किंवा पोस्टाने पाठवली जाऊ शकत नाही आणि कैद्याच्या सुटकेसाठी हार्ड कॉपी पोहोचवणे आवश्यक असते असे आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांनी सांगितले.कारागृहासमोर आर्यनला घेण्यासाठी शाहरुख खान येणार असल्याचे वृत्त आल्यानंतर तिथे लोकांची गर्दी झाली होती.आर्यनची बेल ऑर्डर जारी झाल्यानंतर शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यातून 4 वाहनांचा ताफा बाहेर पडला. यापैकी एका वाहनात शाहरुखही होता.
मुंबई उच्च न्यायालयाने 5 पानी बेल ऑर्डर जारी केली आहे. आर्यनला जामीन देताना कोणत्या अटींचे पालन करावे लागेल, ते यात नमूद केले आहे. त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.


