कोरोनामुळे महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. मुळे केंद्र सरकारने CBSE अर्थात केंद्रीय बोर्डाच्या 10 वी वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 10 वीचे विद्यार्थी परीक्षा न देताच थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत.
CBSE 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या 1 जून रोजी पुन्हा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा घेणार असल्यास त्याच्या 15 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.दहावीच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होणार होत्या पण विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेट अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.
बारावीच्या परीक्षा 4 मे ते 14 जून पर्यंत होणार होत्या पण आता परीक्षा असल्यास 15 दिवसांपूर्वी कळवले जाणार आहे.अनेक राज्य सरकारांनी CBSE च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली सरकारचा समावेश आहे.कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा परीक्षा रद्द करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.