नोकियाने बऱ्याच कालावधीनंतर आपला अँड्राईड टॅब्लेट भारतात लॉन्च केला .यामध्ये 2K डिस्प्ले देण्यात आला आहे 8,200mAh ची बॅटरी 15 तास वेब ब्राउजिंग करू शकते. सोबतच या टॅब्लेटमध्ये स्टीरियो स्पीकर देखील देण्यात आले आहे. या टॅब्लेटसाठी तीन वर्षाची सिक्युरिटी कंपनीने दिली आहे.
या टॅब्लेटचे तीन वेगवेगळ्या डिझाइन्स आहेत यामध्ये एकात दोन वाय-फाय व एक सिम कार्डची सुविधा देण्यात आली आहे. वाय-फायच्या टॅब्लेटमध्ये 3GB रॅमसह 32GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्याची किंमत 15,499 रुपये इतकी ठेवली आहे.
दुसऱ्या टॅब्लेटच्या डिझाइनमध्ये 4G रॅमसह 32GB स्टोरेज असून त्याची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि 4G मॉडेलसाठी ग्राहकांना 18,499 रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये अँड्राईड प्रणाली ११ वर काम करतो. या टॅब्लेटमध्ये 10.4 इंच 2K (2,000×1,200 पिक्सेल) चे डिस्प्ले देण्यात आले आहे. हा टॅब्लेट बाजारात 2 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट nokia.com या सह ऑफलाइन स्टोर आणि फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करता येणार आहे. सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर रिअर कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा असणार आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी यात LED फ्लैश देखील देण्यात आला आहे. डबल मायक्रोफोनसह स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहे.


